कॉमन्स:आम्हास संपर्क करा/समस्या

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of a page Commons:Contact us/Problems and the translation is 100% complete. Changes to the translation template, respectively the source language can be submitted through Commons:Contact us/Problems and have to be approved by a translation administrator.


प्रास्ताविक

समस्या
कॉमन्सवर असलेल्या संचिका व पाने, प्रताधिकारासह

आशयाचा पुनर्वापर
आपले प्रकाशन किंवा संकेतस्थळासारख्या इतर ठिकाणी आमच्या संचिकांचा पुनर्वापर कसा करावा

व्यक्ती
विकिमिडिया कॉमन्सवरील सदस्यास वैयक्तिकरित्या कसा संपर्क करावा

दानदाते
या प्रक्रियेबद्दल शोधा, दान कसे करावे व आपले पैसे कसे खर्च होतात याबद्दलची माहिती

पत्रकारिता
जर आपण पत्रकार असाल व विकिमिडिया कॉमन्सशी संपर्क करु ईच्छिता किंवा आपलेपाशी आमचेसाठी व्यावसायिक प्रस्ताव आहे


समस्याग्रस्त चित्रांचा अहवाल द्या

सर्व समस्या अहवालांसमवेत,कृपया संबंधित चित्राचा दुवा (किंवा पानाचा) द्या व त्या समस्येचे वर्णनही द्या.

प्रताधिकार उल्लंघन

  • प्रताधिकार उल्लंघनाच्या किंवा तत्संबंधी बाबींसाठी त्वरीत सहाय्याबाबत,आपण साहाय्य चमूला विपत्र पाठवू शकता: commons-copyvio@wikimedia.org * येथे

आपली DMCA/OCILLA फॉर्मॅट विनंती दाखल करावयाची तर, ती विकिमिडिया फाऊंडेशनच्या प्राधिकृत अभिकर्त्यास पाठवा.

लहान मुलांची अयोग्य चित्रे

लहान मुलांची अयोग्य चित्रांबाबत अहवाल देण्यास विकिमिडिया फाऊंडेशनला यावर विपत्र पाठवा legal-reports@wikimedia.org. आशयाचा दुवा जोडण्याची खात्री करा. आम्ही समाज सदस्यांना उच्च दर्जाच्या अयोग्य आशयाचे अधिभारण किंवा आर्चिव्ह करण्यास प्रोत्साहन देत नाही.

स्वतःचे चित्र

जर आपणास आपले स्वतःचे चित्र किंवा व्हिडिओ आपल्या परवानगीशिवाय वापरलेला आढळल्यास, किंवा आपले स्वतःचे चित्र हटविण्याची विनंती करावयाची असेल तर:

  • त्वरीत साहाय्यासाठी,आपण साहाय्य चमूला येथे विपत्र पाठवू शकता:info-commons@wikimedia.org *.
  • माध्यमे हटविण्याची खात्री दिल्या जाऊ शकत नाही.सामान्यपणे,खाजगी ठिकाणी घेतलेली, जी तक्रारकर्त्याच्या खाजगीपणाच्या अधिकारास सन्मान देण्यास अयशस्वी ठरतात,अशी माध्यमे हटविण्यात येतात.
    courtesy deletion अशासारख्या वगळण्याच्या विनंत्यांना अद्याप एकसमान नीती नाही व त्यांचे पुनरावलोकन प्रकरण-दर-प्रकरण केल्या जाते.

संकेतस्थळ किंवा सदस्यांबाबत अहवाल पाठवा

  • सदस्यांचे अडचणीच्या वर्तणुकीबाबत अहवाल पाठविण्यास व प्रचालकास कार्यवाहीची विनंती करण्यास (वर दिलेल्या यादीतील बाबींव्यतिरिक्त) आपण info-commons@wikimedia.org * येथे विपत्र पाठवू शकता किंवा प्रशासकांच्या सूचनाफलकावर संदेश टाकू शकता.

तांत्रिक बाबी


* हा स्वयंसेवकांतर्फे पुरविण्यात आलेला एक अनौपचारिक परंतू जलद व तारतम्याचा संपर्क आहे.