Commons:विकी लव्हज् लव्ह २०१९
The results for Wiki Loves Love 2019 Photographic competition has been declared. Please visit the Results page to see the winning files.
विकी लव्हज् लव्ह २०१९ वर आपले स्वागत आहे!
विकी लव्हज् लव्ह (डब्ल्यूएलएल) ही एक आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धा आहे जी विकिमिडिया समुदायाने जगातील विविध प्रदेशांतील संस्कृती आणि प्रेम कथा कहाण्यांच्या दस्तावेजीकरणासाठी आयोजित केली आहे.
संकल्पना
स्पर्धेचे मूळ उद्दिष्ट मानवी सांस्कृतिक विविधतेद्वारे प्रेम कहाण्यांची छायाचित्रे एकत्र करणे - जसे स्मारक, उत्सव, उबदार स्पर्शांचे प्रतीक आणि प्रेम प्रतीक म्हणून वापरल्या जाणा-या विविध वस्तू - जागतिक ज्ञानकोश विकिपीडिया व इतर विकिमीडिया फौंडेशनच्या प्रकल्पात वापरण्यासाठी. विकी लव्हज् अर्थ (डब्लूएलई) आणि विकी लव्हज् मोनुमेंट्स (डब्ल्यूएलएम) प्रमाणे, कोणतीही छायाचित्रे जी ह्या कार्यक्रमास पूरक असतील, जरी डब्ल्यूएलएल संरक्षित क्षेत्राच्या कोणत्याही अधिकृत यादीपर्यंत मर्यादित नाही तर प्रेम सर्वत्र होऊ शकते!
म्हणूनच प्रादेशिक किंवा राष्ट्रीय महत्त्व असले तरीही प्रेम कहाण्यांच्या विस्तृत प्रादेशिक किंवा राष्ट्रिय प्रकारावर लक्ष केंद्रित करणे शक्य नाही. याचा अर्थ बहुतेक सदस्य त्यांच्याशी संबंधित अनेक संबंधित विषय शोधू शकतील, त्यामधे ऐतिहासिक स्मारके किंवा रोजच्या जिवनातील घटनांचा समावेश असू शकतो.
कालावधी
- १-२८ फेब्रुवारी २०१९.
- सादरीकरणाची अंतिम मुदत :२८ फेब्रुवारी २०१९,२३:५९ यूटीसी.
- निकालांची घोषणा :१४ एप्रिल २०१९च्या दरम्यान.
बक्षिसे
- पहिले बक्षिस: – US$400
- दुसरे बक्षिस: – US$300
- तिसरे बक्षिस: – US$100
- चलचित्र: – US$100
- समुदाय बक्षिस: – US$५० चित्र व US$५० चलचित्र
- १० सांत्वना बक्षीस: – US$15 प्रत्येक
- विजयी व आयोजकांना प्रमाणपत्रे
- विकी लव्हज् लव्ह पोस्टकार्ड प्रथम १००० उपलोडर सदस्यांना
- आंतराष्ट्रीय टीम सदस्यांना टी-शर्ट व प्रमाणपत्र
(नोंद: स्वतंत्र सदस्य/संघटनेला अधिक अपलोड करण्यासाठी बक्षीस दिले जाईल. जर चलचित्र विभागात विजेता नसेल तर ते बक्षीस समूदायास विजेता म्हणून विभागून दिले जाईल.)
विजेते
- १५ विजयी चित्रे/चलचित्रे असतील!
प्रश्न कुठे विचारायचे?
प्रश्न किंवा सूचनांसाठी प्राथमिक जागा डब्ल्यूएलएल २०१९ची चर्चापान आहे. (तुम्हांला सोपी पडते ती भाषा वापरा, आम्हाला विविधता आवडते आणि आम्ही तुमची भाषा समजून घेण्यास पर्याय शोधू शकतो, त्यामुळे तुम्हांला सोपी वाटते अशा कोणत्याही भाषेत लिहायला तुम्ही मोकळे आहात).
येथे स्पर्धेची अधिक माहिती पहा
स्पर्धेची व्याप्ती : प्रेरणा मिळण्यासाठी खालील उदाहरणे पाहू शकाल
जगाच्या सर्व खंडामधून, सर्व संस्कृती/सभ्यतांमधून प्रेम साजरे करणाऱ्या सर्व सण, उत्सव आणि धार्मिक विधींच्या दस्ताऐवजीकरणासाठी ह्या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे, त्यामुळे ह्यातील कोणत्याही घटनेची छायाचित्रे तुम्ही येथे आणू शकाल, आणखीन कल्पनांसाठी जगभरातील सणांची यादी तपासा.
-
बारा जमातींंच्या लग्नातील समारंभातील नृत्य
-
हिंदू संस्कृतीमधील "आरती स्वागतम्" हा धार्मिक समारंभ
-
छट्टनुंगा, टेनेसी, यूएसए येथील नव विवाहित जोडपी.
-
रशियातील रॉडनोव्हर पद्धतीचे लग्न
-
त्रिनिटा देई मॉन्टी, रोम, इटली येथे विवाह चुंबन
-
मलेशियामधील लग्न समारंभ
-
स्पेनमधील चिल्ड्रन कार्निव्हल परेड.
-
भारताच्या केरळ राज्यामधील ओनम हा सण
-
पूर्वी नायजेरिया मधील जिगिदा नृत्य
-
स्पेन मधील लोककथा उत्सव
-
हॅप्नी ब्रिज, डब्लिन, आयर्लंडवर प्रेम पॅडलॉक्स
-
भारतातील वाराणसी येथे बनारस घाट येथे धार्मिक विधी
-
भारतातील थ्रिसूर येथे कुमाटिकली मास्क-डान्स सादर करणाऱ्या कलाकार
-
दिवाळीच्या सणाला दिवा पेटवून ठेवत असताना एक महिला.
-
कॅमेरूनमधील नागोंदो उत्सव दरम्यान सावा नृत्य गट
-
भारतातील रक्षाबंधन ह्या सणाच्या वेळी तयार केलेली प्रसंगी आरती थाळी
-
नवी दिल्ली इथे रक्षा बंधन दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर छोटी मुली 'राखी' बांधत आहे
-
होळीचा सण, महाराष्ट्र राज्य, भारत
-
दक्षिण आफ्रिकन पारंपारिक लग्न
-
कोंटली, जिबूती, अफ्रिका येथे पारंपारिक नृत्य
-
पश्चिम सुमात्रा, इंडोनेशिया मधील नवविहित जोडपी
-
आफ्रिकेतील पारंपारिक नृत्य
-
रशिया मधील ऑर्थोडॉक्स अंत्यविधी
-
पारंपारिक अल्बेनियन विवाह सोहळा
-
भारतीय संस्कृतीत कन्यादान विधी
-
शेतकरी समाजातील विवाह सोहळा, फिनलंड
-
पारंपारिक विवाह, मिन्हाग येरुशालायम, जेरुसलेम
-
राजपूत समाजाच्या विवाह सोहळ्यात घोड्यावर बसलेला नवरदेव, भारत
-
सांता क्लॉजची भेट