File:Mumbai Elphinstone Road station stampede tragedy.webm
Original file (WebM audio/video file, VP8/Vorbis, length 2 min 29 s, 854 × 480 pixels, 1.36 Mbps overall, file size: 24.25 MB)
Captions
Summary
[edit]DescriptionMumbai Elphinstone Road station stampede tragedy.webm |
मराठी: २९ सप्टेंबर २०१७ हा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला.काल परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकामधील पुलावर चेंगरा -चेंगरी होऊन २५ लोकांचा मृत्यू झाला तर ३८ लोक गंभीर जखमी झाले .दर वर्षी लाखो लोक आपलं स्वप्न घेऊन या मायानगरीत येतात आणि कालांतराने मुंबईचाच एक अविभाज्य घटक बनून राहतात . इथे प्रत्येकजण बिझी असतो. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहो रात्र धडपडत असतो.पायाला भिंगरी लागल्यागत पळत असतो. आणि त्याच्या या सर्व प्रवासात त्याची एकमेव साक्षीदार असते ती म्हणजे मुबंईतली लोकल ट्रेन
मात्र याच ट्रेनने काल त्यांचा घात केला . मुंबईमध्ये लोकल ठप्प तर अवघी मुंबई ठप्प एवढं लोकलच या शहरात महत्व. लोकल ट्रेन आणि मुंबईकर हे समीकरण वर्षानुवर्षे असंच चालत आलं आहे.मुंबईकरांसाठी २९ सप्टेंबरचा दिवस उगवला तो नेहमीसारखाच धावपळीचा आणि गर्दीचा. प्रत्येकाला आपल्या कामावर जाण्याची घाई . मात्र परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात आपल्यासोबत असं काही होणार आहे. हे रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठे ठाऊक होते? सकाळी १०.३० - ११ च्या सुमारास परळ स्टेशनवर लोकल थांबली, पाऊस सुरु झाला. पाठोपाठ दुसरी लोकलही थांबली. त्यामुळे परळ-एल्फिन्स्टन पुलाच्या पायऱ्यांवर प्रवाशांची एकच गर्दी झाली. काय होते आहे हे कळण्याच्या आतच प्लॅटफॉर्म आणि पुलावर क्षमतेपेक्षा जास्त लोक जमले.आणि यानंतर सुरु झालं मृत्यूचं तांडव. पुलावर क्षमतेपेक्षा जास्त लोक जमल्याने पुलाचा काही भाग किंचितसा खचला आणि पूल पडणार असल्याच्या अफवेने लोकात एकच हलकल्लोळ उडाला. लोक जिवाच्या आकांताने जागा दिसेल तिकडे धावू लागले .आणि यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाला. तर ३३ लोक जखमी झाले.हे सर्व शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाचे बळी ठरले आहेत. मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनची पश्चिम,मध्य आणि हार्बर अशा तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. या तिन्ही लाईन दरम्यान परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांसारखे अनेक धोकादायक रेल्वे स्थानक आहेत. ज्यांच्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात पुन्हा एकदा एल्फिन्स्टन सारखा एखादा अपघात या रेल्वे स्थानकांवर देखील होण्याची श्यक्यता आहे . अशाच काही स्थानकांचा घेतलेला आढावा . परळ परळ हा तसा मुंबईतील अतंत्य महत्वाचा परिसर मानण्यात येतो बरीच शासकीय निमशासकीय आस्थापनांची कार्यालये तसेच अनेक खासगी संस्थांची कार्यालये याच परिसरात असल्याने या रेल्वे स्टेशनवर कायमच गर्दी असते या स्टेशनवर उभारण्यात आलेला पहिला पूल प्रवाशांसाठी कमी पडत असल्याने दुसऱ्या उप पुलाची निर्मिती करण्यात आली मात्र या पुलाचे काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे असून पूल चढून जाण्यासाठी करण्यात आलेल्या पायऱ्यांमध्ये देखील ताळमेळ नसल्याचं पाहायला मिळतं काही पायऱ्या या आखूड झाल्या आहेत तर काही पायऱ्या या जास्त रुंदीच्या असल्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही जोगेश्वरी जोगेश्वरी या स्थानकावर जरी फास्ट ट्रेन थांबत नसल्या तरी कमी जागेमुळॆ या ठिकाणी कायमच गर्दी पाहायला मिळते जोगेश्वरी स्थानकाच्या जिन्यावर गर्दीचा लोंढा वाहत असतो. जोगेश्वरी स्थानकावर दोन आणि तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरील जिना अरुंद असल्याने या ठिकाणी बोरिवली आणि चर्चगेट या दोन्ही दिशांना जाणाऱ्या गाडय़ा एकाच वेळी स्थानकात दाखल झाल्यास गर्दी होते. जिन्याकडे जाणारी गर्दी अगदी लोकलच्या मधल्या डब्यापर्यंत आलेली असते. जिन्यावरही गर्दी वाढून धक्काबुक्की मोठय़ा प्रमाणात होत असते. ही गर्दी जिन्यापर्यंत पोहचण्याआधीच बहुतेक वेळा दुसऱ्या गाडय़ा स्थानकात दाखल होतात आणि गर्दीमध्ये अधिकच भर पडते. दादर दादर हे मुंबईमधील सर्वात मोठं जंक्शन आहे या ठिकाणी हर्बर आणि पश्चिम मार्गाने जाणाऱ्या सर्व गाड्या स्टॉप घेतात. तसंच मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस ट्रेन दादरला स्टॉप घेत असल्यामुळे या स्टेशनवर प्रचंड गर्दी असतेविरार आणि बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाडय़ा पश्चिम रेल्वेवरील दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर थांबतात. या ठिकाणी चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. दादर स्थानकावरील मधला पूल मोठा करण्यात आला असला तरी, या पुलाला जोडणारे जिने चिंचोळे आहेत. त्यामुळे येथेही चेंगराचेंगरी घटना होतात दादरच्या एक व दोन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर दिवसाच्या कोणत्याही वेळी गर्दी असते. ठाणे-डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या गाडय़ांसाठी असलेला हा प्लॅटफॉर्म इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत दक्षिणेकडे आहे. त्यामुळे जिना रुंद असला तरी मुख्य पुलाशी जोडणारा एकच मार्ग असल्याने त्यावर प्रचंड गर्दी होते. बोरिवली याही ठिकाणी प्रचंड गर्दी असते चर्चगेट आणि विरारला जोडणारा बोरिवली हा मुख्य दुवा असल्याने लाखो लोक विरार बोरिवली चर्च गेट असा दररोज प्रवास करत असतात मात्र बोरिवलीला होणारी गर्दी पाहता या स्टेशनवर उभारलेले पूल हे खूप अरुंद आणि तोकडे वाटतात भविष्यात याही ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना होऊ शकतात ठाणे वाशी-पनवेलहून ठाणे स्थानकात आलेल्या गाडय़ा आणि सीएसएमटीहून ठाणे स्थानकात येणाऱ्या जलद आणि धिम्या गाडय़ा एकाच वेळी या स्थानकात आल्यास प्रचंड गर्दी होते ठाणे स्थानकातील रेल्वे पूल जरी विस्तारित असले तरी देखील ते अपुरे पडत आहेत विशेषतः सकाळी ९ ते ११ आणि रात्री ७ ते १० या वेळेत ठाणे स्टेनवर प्रचंड गर्दी असते त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी नेहमीच होत असतात .
|
Date | |
Source | YouTube: Mumbai Elphinstone Road station stampede tragedy : भय इथले संपत नाही...| Prabhat Online News – View/save archived versions on archive.org and archive.today |
Author | Prabhat Online News |
Licensing
[edit]- You are free:
- to share – to copy, distribute and transmit the work
- to remix – to adapt the work
- Under the following conditions:
- attribution – You must give appropriate credit, provide a link to the license, and indicate if changes were made. You may do so in any reasonable manner, but not in any way that suggests the licensor endorses you or your use.
This file, which was originally posted to YouTube: Mumbai Elphinstone Road station stampede tragedy : भय इथले संपत नाही...- Prabhat Online News(archive), was reviewed on 12 February 2020 by the automatic software YouTubeReviewBot, which confirmed that this video was available there under the stated Creative Commons license on that date. This file should not be deleted if the license has changed in the meantime. The Creative Commons license is irrevocable.
The bot only checks for the license, human review is still required to check if the video is a derivative work, has freedom of panorama related issues and other copyright problems that might be present in the video. Visit licensing for more information. If you are a license reviewer, you can review this file by manually appending | |
File history
Click on a date/time to view the file as it appeared at that time.
Date/Time | Thumbnail | Dimensions | User | Comment | |
---|---|---|---|---|---|
current | 05:57, 18 July 2018 | 2 min 29 s, 854 × 480 (24.25 MB) | Tiven2240 (talk | contribs) | Imported media from https://www.youtube.com/watch?v=WzlDPLrplVM |
You cannot overwrite this file.
File usage on Commons
The following page uses this file:
Transcode status
Update transcode statusFile usage on other wikis
The following other wikis use this file:
- Usage on www.wikidata.org
Metadata
This file contains additional information such as Exif metadata which may have been added by the digital camera, scanner, or software program used to create or digitize it. If the file has been modified from its original state, some details such as the timestamp may not fully reflect those of the original file. The timestamp is only as accurate as the clock in the camera, and it may be completely wrong.
Software used | Lavf57.25.100 |
---|